Ad will apear here
Next
पुण्यात पंधराव्या ‘बसंत उत्सवा’त नृत्य आणि गायनाने वातावरण संगीतमय


पुणे :
बांगिया संस्कृती संसदच्या वतीने पुण्यात नुकताच ‘बसंत उत्सव सांस्कृतिक कार्यक्रम २०२०’ साजरा झाला. प्रचंड उत्साहपूर्ण, सकारात्मक भावना जागृत करणारा असा सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून ‘बसंत उत्सव’ प्रसिद्ध आहे. १६ फेब्रुवारी रोजी ‘एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन’मध्ये हा उत्सव साजरा झाला. यंदा कार्यक्रमाचे पंधरावे वर्ष होते.

वसंत ऋतूतील रम्य सकाळच्या छटांचे विविध पैलू नृत्याद्वारे उलगडण्यात आले. रवींद्र संगीतातून सुंदर गीतांची संगीत आणि नृत्य यांच्याशी सांगड घालून वसंत ऋतूचे दर्शन या सांस्कृतिक कार्यक्रमातून घडविण्यात आले.



‘फागून दिनेर रबी’ या कार्यक्रमात पुण्यातील विविध भागांतून शंभराहून अधिक कलाकार सहभागी झाले होते. विविध गट आणि सांस्कृतिक समुदाय यांच्या एकत्रित सादरीकरणाचा हा कार्यक्रम म्हणजे उत्तम उदाहरण होता. रवींद्रनाथ टागोर यांच्या रचनांमधील निवडक दहा गाणी नृत्याद्वारे सादर करण्यात आली. संपूर्ण वातावरण संगीतमय झाले होते. 



आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध गायिका रवींद्र संगीत कलाकार आदिती मोहसीन (बांग्लादेश) यांचे सादरीकरण हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते. एम्प्रेस गार्डनच्या निसर्गरम्य वातावरणात खुल्या आकाशात झालेल्या कार्यक्रमातील नृत्य आणि गायनाच्या सादरीकरणाने वातावरण वसंत ऋतूमय झाले होते.



कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे, बांग्लादेशचे कलाकार सुरेश पिंगळे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी संगीतकार, गायक व अभिनेते पद्मश्री शेखर सेन, गायक शुर्जो भट्टाचार्य, गायिका सुप्रतीक दास, आदिती मोहसीन, ‘बांगिया संस्कृती संसद’ व ‘बसंत उत्सव’ समितीच्या अध्यक्षा सुजाता पॉल, सांस्कृतिक प्रमुख मधुमिता घोष, बिरेस्वर मित्र, अरुण चट्टोपाध्याय, सुभासीस बागल, शिवाजी मुखर्जी, डॉ. पुलक गुहाथूरता, ‘बांगिया संस्कृती संसद’ कार्यकारी समिती सदस्य उपस्थित होते.    



‘पुण्यातील जुनी सामाजिक-सांस्कृतिक संस्था असलेली ‘बांगिया संस्कृती संसद’ २००६पासून हा कार्यक्रम आयोजित करत आहे. संस्थेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून बंगाली संस्कृती आणि साहित्याचा प्रसार केला जातो’, अशी माहिती ‘बसंत उत्सव’ समितीच्या अध्यक्षा सुजाता पॉल यांनी दिली. 

‘बसंत उत्सव’ पुण्यातील विविध सांस्कृतिक समुदाय आणि सांस्कृतिक एकत्रीकरणातील दुवा आहे. पुण्यातील अनेक कलावंत या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. हा कार्यक्रम शांतिनिकेतन बसंत उत्सवाच्या जुन्या आठवणींना नव्याने उजाळा देतो’, अशी माहिती ‘बांगिया संस्कृती संसद’ च्या सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख मधुमिता घोष यांनी दिली.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZRICJ
Similar Posts
कलाकार घडण्यासाठी हवा प्रत्यक्ष अनुभवच; तंत्रज्ञानाचा वापर कलात्मकता मारण्यासाठी नको पुणे : ‘हल्ली इंटरनेटवर कोणता विषय मिळत नाही असे नाही. त्यामुळे मुलांना एखादा विषय सांगितला की पालक लगेच मोबाइल, इंटरनेट वापरतात; मात्र कोणताही कलाकार घडायचा, घडवायचा असेल, तर मुलांना प्रत्यक्ष अनुभवच देणे आवश्यक असते. स्वतःच्या कल्पकतेने, सर्जनशीलतेतून आणि निरागसतेतून साकारलेली कलाच दीर्घ काळ टिकाव धरू शकते
६७वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव - चौथ्या दिवसाचे व्हिडिओ पुण्यात सध्या सुरू असलेल्या ६७व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात चौथ्या दिवशी (१४ डिसेंबर २०१९) किराणा घराण्याचे गायक ओंकारनाथ हवालदार यांनी कन्नड-मराठी अभंग सादर करून रसिकांची मने जिंकली. शाकिर खान (सतार), तेजस उपाध्ये (व्हायोलिन) यांचे सहवादन, स्वामी कृपाकरानंद, तसेच अश्विनी भिडे-देशपांडे यांचे गायन, डॉ
‘भैरव भवतारक’ नृत्याविष्काराद्वारे नवरसांची अनुभूती पुणे : भक्ती, शक्ती, करुणा, शृंगार, क्रोध अशा विविध भावनांचा मिलाफ असलेल्या ‘भैरव भवतारक’ या अनोख्या नृत्याविष्काराने पुणेकर रसिकांना नवरसांची अनुभूती दिली. महाशिवरात्रीच्या निमित्ताने ‘ऋत्विक फाऊंडेशन’ व ‘ऋजुता सोमण कल्चरल अकॅडमी’च्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रसिद्ध कथक नृत्यांगना
विश्वात कुणीही बेसूर नाही; सूर वैश्विक आहेत पुणे : ‘विश्वात कुणीही बेसूर नाही. आपल्या रोजच्या बोलण्यातही संगीत आहे. मनाची सुरांबरोबर अगदी उत्स्फूर्तपणे तार जोडली जाते. त्यामुळेच सूर वैश्विक आहेत,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध गायक स्वामी कृपाकरानंद यांनी केले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language